वार्तांकन.ह.भ.प.हर्षद मजरेकर.पनवेल. यावर्षीचे पुरस्कारप्राप्त जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री. गजाननबुवा वाठारकर.
वर्धापन दिन २०२१.
आज दि.२७ ऑगस्ट.२०२१ रोजी अखिल भारतीय कीर्तन संस्था,दादर येथे संस्थेचा ८१ वा वर्धापनदिन.कोविद बंधने असूनही हा समारंभ या वर्षी सुद्धा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पण नेहमींच्या उत्साहात पार पडला . गतवर्षी असा सोहळा झालाच नाही म्हणून या वर्षीच्या सोहळ्याचे महत्व आणखी एक विशेष म्हणून संस्थेच्या वाटचालीत संस्मरणीय पाउल ठरेल.
सकाळी विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेनंतर नेहमीप्रमाणे मंगल वाद्यांचा गजर आणि मंत्रघोषात श्री व सौ नाखरे यांचे शुभ हस्ते " श्री.विष्णुयाग " संपन्न झाला.अध्यक्ष श्री.सुरेश उपाध्ये यांनी प्रकृती ठीक नसली तरी या सोहोळ्याची बरीच तयारी आधीच करून कोणत्याही गोष्टीची उणीव पडू दिली नाही. कार्यवाह श्री साठे आणि सह कार्यवाह श्री विठ्ठल परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख विश्वस्त श्री रविंद्र आवटी हेही सकाळपासून हजर होते.आणि अन्य उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.
सध्या च्या या कोविड महामारीच्या संकटकाळात ३१ मे २०२० ते ३१डिसेंबर २०२०पर्यंत दररोज आणि त्या नंतरही विशेष दिवशी सातत्याने कीर्तनसेवा दूरस्थ दादर कीर्तनरंग पेजवर होत होती.आणि अजूनही ठराविक दिन,सण,इत्यादी वेळी होत आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक दिवस ही सेवा सुरु आहे.
त्यासाठी कीर्तनकाराशी संपर्क .फ्लेक्स,लिंक पाठवणे. ही सेवा दूरस्थ तृतीय वर्ष विद्यार्थी ह.भ.प.श्री.संतोष माळवदकर-सोलापूर हे मनापासून करत आहेत.त्याना दूरस्थ कीर्तन उपक्रमाच्या मुख्य संचालिका सौ उमा तेंडोलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
आज संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. रविंद्र आवटी, कार्यवाह श्री.किशोर साठे यांनी माळवदकर यांना उपरणे,श्रीफळ, पुष्पगुच्छ, आणि श्री विठ्ठलाचा प्रसाद देऊन सन्मान केला. या प्रसंगी कोविद बंधनामुळे भाविकाना प्रवेश नव्हता. उपाध्यक्ष श्री सुभाष कर्वे, कार्यकारिणी सभासद सौ उमा तेंडोलकर, सौ सविता भट ,श्री विठ्ठल परब व अन्य मोजकेच मान्यवर उपस्थित होते. या व्रतस्थ सेवा कार्यासाठी भविष्यात प्रेरणा देउन श्री विठ्ठल रुक्मिणी त्यांना उज्ज्वल यश. कीर्ती.सन्मान प्रदान करोत.
अभिनंदन.l संतोषदादा.मनःपूर्वक अभिनंदन.
कोविडच्या संकट काळातही कीर्तन प्रवचनातील ईश्वराच्या नाम यश गुणांचे जयगान व संकीर्तन आधुनिक तंत्र ज्ञानाच्या माध्यमातुन अखंड सुरु ठेवण्याचा आपला उपक्रम व आपले सातत्य निश्चित या प्रशंसेस पात्र आहे.
*अ.भा.कीर्तन संस्थेच्या ८१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री माळवदकर यांचा सत्कार विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत व्हावा ही गोष्ट संस्थेच्या वाटचालीत एक आगळेवेगळे स्थान व्यापून राहील असा विश्वास वाटतो.
या उपक्रमातून गावागावातून नव्या जुन्या ज्ञात / अज्ञात कीर्तनकारांना संतोष दादांनी सेवेची सुसंधी प्राप्त करुन दिली.तसेच रसिक भाविक श्रोत्याना जो आनंद देऊ केला तो सांगायला खरोखर शब्दच अपुरे आहेत.
संपादक.
17 SEPTEMBER 2017 PRABHAKAR PHANSE
30 OCTOBER 2018 PRABHAKAR PHANSE LEAVE A COMMENT
कोरोंना संकटाच्या काळात "लॉक डाऊन " आणि आवाहन.
दादर दि.२८/४/२०२० .
सध्याच्या कोविड महामारीच्या संकटात २०, मार्च २०२० पासून विठ्ठल मंदिर आणि संस्थेचे कामकाज बंद ठेवावे लागत आहे. नित्य पूजा सोडून इतर सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, भाविक भक्त, हितचिंतक श्रोते, कर्मचारी सर्वानीच या काळात घरात सुरक्षित राहून, सरकारी नियमांचे यथायोग्य पालन करावे आणि शांतता आणि संयम पाळून सहकार्य करावे , असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाध्ये यांनी केले आहे.
अखिल भारतीय कीर्तन संस्था , दादर मुंबई येथे वार्षिक परीक्षेच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
१) ” कीर्तन अलंकार ” या पदविका आणि "दूरस्थ" अभ्यासाच्या ३ र्या वर्षाच्या परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावर " यथावकाश" घेण्यात येणार आहेत. २) प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा तहकूब (रद्द) केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घरी सराव आणि अभ्यास सुरु ठेवावा असे आवाहन अध्यक्ष श्री .सुरेश उपाध्ये यांनी केले आहे.
३) नवीन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया आणि विद्यालयाचे कामकाज " लॉकडाऊन चा " काळ संपल्यावर सुरु होईल असे निर्णय घेतल्याचेही दूर् ध्वनीवर बोलताना श्री उपाध्ये यांनी सांगितले .
या विशेष संकट काळात संस्थेच्या अध्यक्षांच्या व्यक्तिगत सक्रीय सहभागाने मंदिरातील पूजा-अर्चा , कार्यालयीन संपर्क,सुरक्षा, इमारतीची देखभाल,साफ-सफाई इत्यादी व्यवस्था चोख ठेवली आहे..त्याबद्दल विशेषतः अध्यक्ष श्री.उपाध्येसर , श्री.परबगुरूजी , बबलू व त्यांचे सर्व सहकारी यांचे कौतुक करावे तितके थोडेच.
संकलन आणि शब्दांकन..
प्रभाकर फणसे बोरीवली .
11 OCTOBER 2017 PRABHAKAR PHANSE LEAVE A COMMENT
*।। विशेष कीर्तने ।।*
संस्थेत “प्रमुख शिक्षक” म्हणून दीर्घकाळ सेवा करणाऱ्या स्व.भागवत गुरुजी, माजी प्राचार्य यांच्या स्मृतीस मानवंदना म्हणून कीर्तन महोत्सवात विशेष कीर्तने शुक्रवार ते रविवार दिनांक २८ फेब्रुवारी, २९ फेब्रुवारी, व १ मार्च २०२० रोजी दुपारी ४.०० ते ६.०० वाजता मंदिरात आयोजित करण्यात आली आहेत .
सर्वांना सस्नेह आमंत्रण !!!
अध्यक्ष,
अ. भा. की. संस्था.
********************************************
*शुक्रवार दि.२८ फेब्रु.२०२०*
*ह.भ.प.सौ.शैलजा जोशी.दादर.*
----------------------------------------
*शनिवार दि.२९ फेब्रु.२०२०*
*ह.भ.प.सौ अंजली जोशी डोंबिवली.*
-----------------------------------------------
*रविवार दि. १ मार्च २०२०*
*ह.भ.प.श्री श्रीधर फडके *विलेपार्ले*
----------------------------------------------
*समय.सायं.४-००ते ६-००*
*स्थान.अ.भा.कीर्तन संस्था* दादर.मुंबई.
****************************
साथसंगत.
*संवादिनी श्रीमती जया त्रासी व* *तबला श्री.मिलींद देशमुख.*
********************************************
सर्वानी अवश्य श्रवणाचा लाभ घ्यावा.
*या समारोहात जमा होणारा आरतीसह सर्व निधी *गुरुवंदना या कायम स्वरुपी* *निधीसाठी*कीर्तन संस्थेकडे*
*सुपूर्द केला जाणार आहे.त्यालाही आपला सढळ हातभार असावा ही विनंती.*
अध्यक्ष
अ.भा.कीर्तन संस्था.दादर मुंबई.२८
सहजच झाला एक विक्रम......जगात विक्रम मुद्दाम ठरवून करता येत नाहीत. ते आपोआप होत जातात . ( आणि ..... जुने मोडतात सुद्धा.)
असेच काहीसे आज (४ जून २०२३ ला )झाले. दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या दूरस्थ कीर्तन उपक्रमाची " गुढी व भागवत धर्माची पताका धरतीवर चारी दिशांना फडकली. आणि समर्थांनी सांगितले तशीच "हरिकथा ब्रह्मांड भेदून " चारी दिशात एकाच वेळी पोहोचली. स्थानिक समय वेगवेगळे पण तरीही एकाच वेळी .....पाहा कसे झाले ते...
हरिनामाचा "जय जय राम कृष्ण हरी " हा गजर सप्त सागर पार करून एकाच वेळी नेण्यासाठी "बोरिवली दूरस्थ कीर्तन वर्गाचा " आजचा एकाच तासाचा वर्ग कारण ठरला.ज्येष्ठ पौर्णिमेच्या मुहूर्तावर , ३ र्या वर्षाचा प्रथम वर्ग हे निमित्त झाले. सध्या बोस्टन मधून चालणाऱ्या या वर्गात शिकणारे ४ विद्यार्थी आणि दोन शिक्षक यात सहभागी झाले. हरिनामाच्या गजराचे पुण्य मात्र पंच पंच उषः काली ६.३० ते रात्रौ १०.३० अश्या दीर्घ काळासाठी पदरात पडले.
सकाळी ९-३० ला बोस्टनहून (MA)-सौ. शुभदा फणसे यांनी नवीन तृतीय वर्षात सर्वांचे स्वागत केले.केंद्राचा अंतिम निकाल, पुढील अभ्यासावर काही माहिती दिली.
सकाळ ९.३० अमेरिकेत पाच सरोवराजवळ " डेट्रॉईट" ( MI) शहरातून सौ नम्रता औंधकर. यांनी नमनाचे श्लोक म्हटले. त्याच वेळी म्हणजे भारतात सायं. ७ ते ८ याच वेळात
सायंकाळी ७.-०० वाजता परेल मुंबई (महाराष्ट्र ) येथून आशा कनवजे. याही नमनात सहभागी झाल्या होत्या. केदार रागातील नमन . बाळकृष्ण चरणी " या पदाची ओळख झाली.केदार रागाचा थोडा अभ्यास ,सराव झाला.
त्याच वेळी रात्रीचे २१-३० .सिंगापूर मधून सौ. मानसी पवार यांनी "प्रकल्प कीर्तन " याविषयी काही प्रश्न विचारून माहिती घेतली. प्रकल्प कसा/कधी पुरा करावा यावर विचार झाला.लेखी परीक्षेवर चर्चा झाली. "झांजेचे ताल " वादन कसे हवे ? यावर मार्गदर्शन /प्रात्यक्षिक झाले.
तेव्हा सकाळचे वेळी ६-३० वाजता San Ramon कॅलिफोर्निया येथील सौ नम्रता आपटे यांनी ३ र्या वर्षाची परीक्षा कशी ? कुठे होणार ? याबद्दल माहित घेतली. आणि वर्गाचा शेवट नेहमीच्या शलोकाने झाला.या आमच्या अनोख्या कीर्तन वर्गाचा एक तासाचा वेळ संस्मरणीय झाला.असा अनोखा योग संस्थेच्या दूरस्थ कीर्तन उपक्रमात प्रथमच घडून आला , हेही विशेष होय.
पुढील प्रत्येक रविवारी पुन्हा असेच भेटण्याचे ठरवून आजच्या वर्गाचा सांगता झाली. केवळ नवे तंत्रज्ञान आहे त्यामुळे जगाच्या ५ कोपऱ्यात वेगवेगळे स्थानिक वेळी ..आणि तरीही एकत्रच...बसून आपण अशी संमेलने शक्य करीत आहोत.
(माहिती संकलन..शुभदा आणि प्रभाकर फणसे.)
या वर्षी ६ जुन २०२३ ला छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील राज्य संस्थापना आणि राज्यरोहण समारंभास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेचे आजी/माजी/दूरस्थ अश्या सर्व विद्यार्थ्यांची " एकूण ३५० कीर्तने व्हावीत असा संकल्प केला आहे.
16 AUGUST 2017 ADMIN 1 COMMENT
सोमवार वार दिनांक २३ , जुलै २०१८ रोजी “देव शयनी ” आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कीर्तन संस्थेचे सभागार आणि सर्व परिसर सुशोभित करण्यात आला होता. रांगोळ्या दीपमाला, तोरणे सर्वत्र लावली होती.सुमधुर संगीताच्या सुरांनी परिसराला जाग आली. पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत षोडशोपचार अभिषेक व यथासांग पूजा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य श्री जोशी गुरुजींनी केले.
संत तुकारामांनी मुंबईत वडाळ्याच्या विठोबाचे मंदिर स्थापन केले तेच महत्व दादरच्या या मंदिराला आज लाभले होते. सोमवार हा कामाचा दिवस असूनही भाविकांची गर्दी होतीच. संस्थेने पूजेसाठी भाविकांना तुलसीपत्र देण्याची व्यवस्था केली होती. प्रसाद वितरणाची सर्व व्यवस्था संस्थेचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक यांनी उत्तम सांभाळली होती.
दादर फुलबाजारातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे फुलांच्या सजावटीने विठ्ठ्लाच्या सेवेत आपला सहभाग अर्पण केला. एका दिंडीचे आयोजन ही मंडळी दर वर्षी करीत असतात हे एक विशेष आकर्षण असते.माहीम येथील अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी मंदिराला भेट देवून प्रार्थना केली.
अनेक भाविकांनी संस्थेला या निमित्ताने आर्थिक मदत देवू केली. गेल्या ७८ वर्षांच्या काळात भाविकांच्या भक्कम पाठींब्यावर ही संस्था आपले कीर्तन प्रशिक्षणाचे कार्य अधिकाधिक उत्तम रीतीने पुढे नेत आहे.हे एक केवळ मंदिर नाही तर एक आदर्श “सांस्कृतिक केंद्र” व्हावे अशी इच्छा अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे.संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह श्री. किशोर साठे तसेच अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि भाविक यांनी या सोहळ्यासाठी सर्व सहकार्य केले..
जय जय विठोबा रखुमाई !!
30 OCTOBER 2018 PRABHAKAR PHANSE LEAVE A COMMENT
परम आदरणीय असलेल्या ह.भ.प. श्रीधरबुवा भागवत पंचत्वात विलीन.
दादर. दि.८/३ /२०१९.
अखिल भारतीय कीर्तन संस्था , दादर मुंबई संचलित ” हेमाडपंत कीर्तन विद्यालय ” येथे प्रदीर्घ १४ वर्षे अध्यापन करून सर्व विद्यार्थ्यात प्रिय असलेले ह.भ.प. श्री .श्रीधरबुवा भागवत. अंधेरी यांना ८४ व्या वर्षी अल्पशा आजारानंतर दि. २८/२/२०१९ रोजी देवाज्ञा झाली . त्यांच्या पश्चात मुलगा,मुली ,सून,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. गुरुजींनी १४ वर्षाच्या कार्य काळात १५० हून अधिक कीर्तनकार उत्तम प्रकारे घडविले. अत्यंत शिस्तप्रिय व आग्रही असूनही खेळकर वातावरणात, हातचे न राखता भरभरून कठीण अध्यात्म विषय आणि कीर्तन शिकविणारे "भागवत सर " विद्यार्थ्यात सर्वाना आपले वाटत.
गोरेगाव मुंबई येथे अ.भि. गोरेगावकर शाळेत गणित आणि संस्कृत मराठी शिकवून "आदर्श शिक्षक" पुरस्काराने सन्मानित श्री. श्रीधर रामचंद्र भागवत हे दादरच्या कीर्तन संस्थेतच ५ वर्षे कीर्तन शिकले. "कीर्तन अलंकार " पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केल्यावर त्याच संस्थेचे "प्राचार्य " होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता.
मुंबईतील अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे प्राचार्य आणि कीर्तन क्षेत्रात एक नामांकित कीर्तनकार ,कुशल मार्गदर्शक, मराठी/ संस्कृत भाषेचे जाणकार, कवी,नट, म्हणून स्व. भागवत गुरुजींचे स्थान मोठे होते. शृंगेरी पिठाच्या प.पू. शंकराचार्यांकडून गुरुजीना "संस्कृत भाषेत कीर्तन " केल्याबद्दल गौरव करण्यात आला होता . पुण्याच्या "नारद मंदिर " संस्थेने त्यांना कीर्तनसेवेतील योगदानाबद्दल " कीर्तन कलानिधी " असा खास पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
अ.भा.कीर्तन संस्थेने दि. ६ मार्च रोजी स्व.भागवत गुरुजीना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक सभा आयोजित केली होती. त्यात गुरुजींचे आप्त,स्वकीय, श्रोते आणि संस्थेतील पदाधिकारी आणि शिक्षक तसेच आजी /माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश उपाध्ये यांनी गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
मनमोकळेपणाने आणि अत्यंत तळमळीने प्राप्त ज्ञान दुसऱ्यांना देण्याच्या भागवत बुवांच्या स्वभावाचे दर्शन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त मनोगतातून झाले. अनेक जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. स्व. श्रीधरबुवा आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान व नवोदित कीर्तनकारांशी देखील प्रेमाने आणि आदराने वागत.तसेच स्व. श्रीधरबुवा दैनंदिन जीवनातही कीर्तन जगत असत याची जाणीव झाली.
निवृत्तीनंतरही विद्यालयाला गुरुजींचे सहकार्य लाभत होतेच . "कीर्तन प्रगत अभ्यासक्रमासाठी " अनेक सूचना भागवत सरांनी केल्या होत्या.प्रगत अभ्यासानंतर देण्यात येणाऱ्या पदविकेला "कीर्तन मधुकर" हे नाव श्रीधर बुवा भागवत यांनीच सुचविले होते.
स्व. भागवत गुरुजींच्या निधनाने मराठी आणि संस्कृत भाषेवर "प्रभुत्व मिळवून ज्ञानदान " करणारा एक हाडाचा शिक्षक गमावला अशीच भावना अनेकजणांनी व्यक्त केली. गुरुजींच्या निधनाने झालेली पोकळी भरून निघणे अशक्यच आहे.
ईश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना.
!! श्रीराम जयराम जय जय राम. !!
शब्दांकन. प्रभाकर फणसे.बोरीवली प.मुंबई.
दादर , मुंबईः दि.१८/०८/२०१९
अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर , मुंबई संचलित कीर्तन मधुकर या प्रगत अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ , संस्थेच्या विठ्ठल मंदिरात , दादर मुंबई येथे आज पार पडला. राष्ट्रीय कीर्तनकार हभप श्री.पुरूषोत्तमबुवा कुलकर्णी यांच्या हस्ते *कीर्तन मधुकर* पदवी प्रमाणपत्र देऊन कीर्तनकारांना गौरविण्यात आलं.
कीर्तन मधुकर " पदवीदान समारंभ. २०१९.
हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कीर्तनकारांसाठी हा दोन वर्षाचा प्रगत अभ्यासक्रम असतो.
प्रत्येकी दोन पूर्ण दिवसीय शिबीर अशी दोन वर्षात ८ शिबीरे घेतली जातात. ज्येष्ठ आणि नामवंत कीर्तनकारांकडून कीर्तनकारांना मार्गदर्शन केलं जातं. यावेळी सुद्धा सर्व आदरणीय सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप श्रीरामबुवा चितळे , महेशबुवा काणे , शरदबुवा घाग , अनंतबुवा कर्वे , वासुदेवबुवा बुरसे , रामचंद्रबुवा भिडे , विलासबुवा पटवर्धन , उदयबुवा फडके इत्यादींनी सखोल मार्गदर्शन केलं.ख-या अर्थाने हा प्रगत अभ्यासक्रम असतो. कीर्तनातील अनेक बारकावे ,संगीत , पद्यभाग व अभिनय अशा विविध अंगांचे मार्गदर्शन कीर्तनकारांना या दोन वर्षीय अभ्यासक्रमात मिळते. अभ्यासक्रम पूर्ण करून सादरीकरण केलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातल्या कीर्तनकारांना हभप श्री.पुरूषोत्तम बुवा कुलकर्णी ,पुणे यांच्या हस्ते कीर्तन मधुकर पदवीने सन्मानीत करण्यात आलं. त्यामध्ये सर्व हभप श्री.हर्षद माजरेकर जैतापूर सौ.अवनी गद्रे , पाली , सौ.अंजली कवळे , रोहा , दिगंबर वाडेकर प्रिंदावन (राजापूर ), सौ.माधवी पवार घाग नृसिंहवाडी , श्री.रविंद्र धोत्रे मुंबई , कृष्णा माळकर सिंधुदुर्ग , अंजली अभ्यंकर पुणे , शंकर विश्वासराव राजापूर , सौ.मिरा फणसेकर दहिसर , यांना सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय कीर्तन संस्था दादरचे अध्यक्ष आदरणीय श्री.सुरेश उपाध्ये , श्री.विठ्ठलबुवा परब व सौ.उमाताई तेंडोलकर यांनी तसेच तबला साथीदार श्री.मिलींद देशमुख व संवादिनी साथीदार श्री.प्रकाश सोहनी यांनी मोलाचं सहकार्य केलं.
---------------
* तीन वर्षांत कीर्तनकार व्हा*
अखिल भारतीय कीर्तन संस्था,दादर
सुरू करत आहे," नारदीय कीर्तनाचा"
प्रथम वर्षाचा Online Course.
** घर बसल्या कीर्तन शिका
आठवड्यातून दोनदा.**
वय वर्षे ८ पासून वय वर्षे ७० पर्यंत कोणीही स्त्री/ पुरुष या Online Course मध्ये सहभागी होवू शकतात.
# वार्षिक शुल्क रु.४०००/- # त्वरा करा, तय्यार व्हा Course करीता
आपले नाव आजच पुढील ई मेल आय डी वर नोंदवा ....
नाव नोंदवल्या वर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन कळविली जाईल.
संपर्क ...०२२-२४३२१४७४ , ( प्रवेश मर्यादित.)
नोंदणीची अंतिम तारीख २० जून २०२० ( नोंदणी करीता Gmail id आवश्यक)
COSMOS BANK, D.L. VAIDYA ROAD, DADAR (W) MUMBAI.400 028
A/C..AKHIL BHARATIYA KEERTAN SANSTHA.
A/C No.-- 012204201001359
IFSC Code--COSB0000012
MICR Code--400164002
२०२१ , मध्ये विशेष कीर्तन वर्गाचे आयोजन , (कृपया छायाचित्रे या विभागात आमचे पत्रक पहावे. धन्यवाद.)